उबाठा सेनेतून भाजपात प्रवेश करणाऱ्या सर्वांचेच केले स्वागत
वैभववाडी प्रतिनिधी :
उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर मंगेश लोके यांचे वैभववाडी भाजपाच्या वतीने येथील भाजपा कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. वैभववाडी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी लोके यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. तसेच उबाठाचे उपविभाग प्रमुख विलास पावसकर, खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम, श्री गायकवाड यांचेही भाजपा पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, नासिर काझी, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, श्रद्धा रावराणे, रितेश सुतार, नेहा माईणकर, रेखा खाडे, संगीता चव्हाण, रमेश शेळके, अवधूत नारकर व पदाधिकारी उपस्थित होते.













