अडरे मांडवखरी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये म. गांधी आणि लालबहादुर शास्त्री जयंती साजरी

चिपळूण (वार्ताहर) : अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी अडरे मांडवखरी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमाना विद्यमान सरपंच दीक्षा कांबळी व उपसरपंच संजना कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यादरम्यान अंगणवाडी सेविका शरयू शरद कदम, प्रभावती कृष्णा भैरवकर, आशा सेविका रश्मी रवींद्र महाडिक यांना सर्वोत्कृष्ट सेवेबाबत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन अडरे ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आहे. आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या या सामाजिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेविका, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रा. पं. चे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामसेविका वैजयंती राऊत यांनी केले.