विश्व कल्याणाच्या हेतूने सामाजास अभिप्रेत कार्य करण्याचा संघाचा प्रयत्न

श्रीराम महाजन यांचे संघाचे विजयदशमी उत्सवात प्रतिपादन

मंडणगड | प्रतिनिधी – विश्व कल्याणाच्या भारतीय तत्वज्ञानावर मार्गाक्रमण करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशास परम वैभवाला नेण्याचे उद्देशाने सामाजाला गरजेचे व आपेक्षीत असलेले कार्य करीत असल्याचे प्रतिपादन श्रीराम महाजन यांनी केले.

5 ऑक्टोंबर 2025 रोजी भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात संघाचे शताब्दी वर्षाचे निमीत्ताने मंडणगड उपखंडाचे वतीने आयोजीत करण्यात आलेल्या विजयादशमी उत्सवास प्रमुख वक्ते म्हणून श्री महाजन यांची उपस्थिती लाभली यावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीधर बाम, व तालुका कार्यवाह हेमंत भागवत यांची उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना श्री. महाजन पुढे म्हणाले सत्ता मिळवणे हे संघाचे साध्य नाही सत्ताकारणातून झालेले बदल दीर्घकाळ टिकत नाहीत तर समाजाने अंगीकारलेले बदल शाश्वत असल्याने संस्कारीत व शिस्तप्रिय समाजाचे निर्माण करण्यासाठी पाच पिढ्यातील अनेकानेक संघ प्रचारक व कार्यकर्त्यांनी निस्पृह भावनेने केलेल्या त्यागाचे बळावर संघाची शंभर वर्षाची वाटचाल पुर्ण झाली आहे. संघाचे समकालीन सुर झालेल्या अनेक चांगल्या विचार व कार्याच्या अनेक संघटना काळाच्या ओघात मागे पडल्या अथवा संपल्या पण संघाची वाटचाल एका विशिष्ठ गतीने संघाने निश्चीत केलेल्या ध्येयाप्रती सुरु आहे आगामी काळात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माध्यमातून सामाजीक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन स्व आधारीत जीवन व नागरीकांचा कर्तव्यबोध या पाच प्रमुख विषयावर लक्ष केंद्रीत केले जाणार शताब्दी वर्षाचे निमीत्ताने वर्षभर विविध उपक्रम साजरे केले जाणार आहेत यात व्यापक गृह संपर्क अभियान, हिंदू संमेलन,समाजातील प्रमुख व्यक्तीसोबत व्यक्ती संवाद, सामाजीक सद्भाव बैठक, युव संमेलन, शाखा विस्तार सप्ताह असे उपक्रम होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. विजयदशमीचे उत्सावास शहर परिसरातील संघ स्वयंसेवक महिला स्वयंसेवक नागरीक संघ परिवारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.