दोडामार्ग – प्रतिनिधी
हिंदू धर्मरक्षणासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी ६ ऑक्टोबरला दोडामार्ग बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत सोमवारी दोडामार्ग बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.
अलीकडेच काही पदाधिकारी तसेच अन्य ५० ते ६० हिंदू धर्मरक्षक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यापैकी १५ ते १६ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. याच कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी दोडामार्ग बंद ठेवण्यात आला होता.
बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असली तरी, अत्यावश्यक सेवेतील काही दुकाने तसेच हॉटेल्स मात्र सुरू होती.












