शिवसेना मालवण तालुका सरचिटणीस पदी मकरंद राणे यांना नियुक्ती

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी केले अभिनंदन

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात मालवण तालुक्यातील असरोंडी गावात माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची बैठक संपन्न झाली. यावेळी शिवसेना मालवण तालुका सरचिटणीस पदी मकरंद राणे यांना नियुक्ती देण्यात आली. माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी त्याचे अभिनंदन करतं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

या सोबत गावातील शिवसेनेच्या अन्य नियुक्ती करण्यात आल्या आहेत. यात शिवसेना गाव प्रमुख प्रकाश विठ्ठल सावंत, शाखा प्रमुख सचिन वसंत गावडे यांची निवड करण्यात आली. तर उपशाखा प्रमुखपदी मयूर सुरेश घाडीगांवकर, किशोर दामोदर सावंत, मिलिंद मारुती शेलार, कोषाध्यक्ष विठ्ठल बापू सावंत, गटप्रमुख दत्ताराम गावडे, रमेश जंगले, चंद्रकांत सावंत, नितीन परब, पवन हातनकर, झिलु जंगले, मनोहर सावंत, चंद्रकांत सावंत, अजित असरोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली.

 

यावेळी गणेश शिंगडे, सुनील शिंगडे, महेश परब, प्रकाश कदम, अनिल सावंत, युवा शाखा प्रमुख देवू घाडीगांवकर, मयूर घाडीगांवकर, अमोलरमाकांत गावडे, श्रीकांत राणे, अमोल रामचंद्र गावडे, युवासेना उप जिल्हा प्रमुख मिहीर राणे, माजी शाखा प्रमुख राजेंद्र सावंत, प्रदीप सावंत, संतोष महाजन, संजय सावंत, सूर्यकांत सावंत, सतीश सावंत, अभिजित सावंत उपस्थित होते.