राजापूर (प्रतिनिधी): सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या भ्याड हल्ल्याचा राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीने मंगळवारी जाहिर निषेध करण्यात आला. राजापूर न्यायालयाच्या बाहेर प्रवेशद्वारावर राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीने या कृत्याचा जाहिर निषेध करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात बुट फेकण्याचा दुदैवी प्रकार सोमवारी घडला. याचे तीव्र पडसात देशभरात उमटले आहेत. या कृत्याचा सर्वत्र जाहिर निषेध केला जात आहे. राजापूर तालुका बार असोशिएशनच्या वतीनेही मंगळवारी राजापूर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्रित येत सर्व वकिलांनी या कृत्याचा जाहिर निषेध केला. राजापूर तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येत बार कौन्सीलने या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध केला.
याप्रसंगी ॲड. विलास कुवळेकर, ॲड. सुरेश सिनकर, ॲड. मिलींद चव्हाण, ॲड. यशवंत कावतकर, चंद्रशेखर अभ्यंकर, ॲड. सुनिल मेस्त्री, ॲड. राहुल राणे, ॲड. सुनैना देसाई, ॲड. तेजस्वीनी राणे, ॲड. सुशांत पवार, ॲड. समिर कुंटे, ॲड. प्रकाश सातोपे, ॲड. प्रविण नागरेकर, ॲड. तावडे, ॲड. अविनाश कुवेसकर, ॲड. तन्मय सिनकर, ॲड. प्रतिभा शेटये, ॲड. विलास पळसमकर, ॲड. स्वाती गोरले, तसेच दिवाकर आडविरकर, मेहेश माटल आदी उपस्थित होते.
फोटो 7 आरजेपी 2
राजापुरात राजापूर तालुका बार असोशिएशनचे वतीने निषेध नोंदविताना वकिल वर्ग.











