भाजपा युवा मोर्चा तालुका संयोजक संकेत घाग यांची पक्षवाढीसाठी संकल्पना
लांजा (प्रतिनिधी) हर घर मोदी, हर घर भाजपा या उपक्रमांतर्गत भाजपाचे युवा मोर्चा तालुका संयोजक संकेत घाग व भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकतेच तालुक्याच्या पूर्व भागातील दशक्रोशीतील ग्रामदेवतांचे दर्शन त्याचप्रमाणे गावकरी आणि गावचे प्रमुख मान्यवर यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या.
लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील सालपे गावचे सुपुत्र असलेले आणि भाजपा तालुका युवा मोर्चाचे संयोजक म्हणून काम करणारे संकेत घाग यांनी भाजपा पक्षाला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मनोदय केला आहे. हर घर मोदी आणि हर हर भाजपा या उपक्रमांतर्गत त्यांनी दशक्रोतीतील ग्रामदेवतांच्या मंदिरात जाऊन त्या देवतांचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे प्रत्येक गावच्या गावकऱ्यांची ,गुरव, मानकरी यांच्या भेटीसाठी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याखेरीज त्या त्या गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, तेथील मानकरी यांच्या देखील भेटीसाठी घेतल्या आणि भाजपा पक्ष त्याचप्रमाणे राज्य व केंद्रातील लोककल्याणकारी योजना या लोकांपर्यंत ,सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
संकेत घाग यांच्या या शिवशक्ती आशीर्वाद यात्रेमध्ये भाजपाचे लांजा तालुका सरचिटणीस सुनील गुरव, शिपोशी गावचे बुथ अध्यक्ष राजन बाईंग आदींसह अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते











