शिरगाव (प्रतिनिधी)देवगड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात (मोठ्या गटात) माध्यमिक विद्यामंदिर, साळशी या शाळेचा विद्यार्थी रुपल प्रभाकर साळसकर याने द्वितीय क्रमांक पटकावला.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सत्यवान सावंत, संस्था पदाधिकारी, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले, सदस्य, मुख्याध्यापक माणिक वंजारे, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.












