मोहन घाडी यांचे सर्पदंशाने निधन

दाभोळे गावावर ऐन दिवाळीत शोककळा

देवगड तालुक्‍याच्‍या नजीकच्‍या दाभोळे गावातील युवा शेतकरी आणि गंवडी कामगार मोहन गोविंद घाडी वय वर्षे 55 नेहमी प्रमाणे शुक्रवारी आपल्‍या पत्‍नी सोबत शेतात गेले होते. शेतात काम करीत असताना व्‍हेनम जातीच्‍या घोणसाने त्‍यांच्‍या पायाचा जबरी चावा घेतला. त्‍याच अवस्‍थेत ते अर्धा तास चालत आपल्‍या बायकोसह घरी आले. देवगड मधील ग्रामीण रूग्‍णालयात उपचारासाठी गेले असता संबधीत ठीकाणच्‍या आरोग्‍य अधिकारी यांनी त्‍यांना ओरोस सिव्‍हील रूग्णालयात उपचार घेणेसाठी पाठविले. शनिवारी रात्री उशीरा त्‍यांना पुढील उपचारासाठी गोवा रानबांबुळी येथे हालविण्‍यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्‍यांची प्राण ज्‍योत मालवली. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी, मुलगी विवाहित भाऊ असा परिवार आहे.