तर ऋषिकेश चिपळूणकर उत्तीर्ण झाले एलएलबी परीक्षा
चिपळूण | वार्ताहर : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष बाळाराम चिपळूणकर यांचे सुपुत्र शुभम बाळाराम चिपळूणकर यांनी आर्कीटेक डिग्री संपादन करत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. तर त्यांच्या दुसरे सुपुत्र ऋषिकेश चिपळूणकर यानेही एल एल बी परीक्षा उत्तीर्ण होत वकील होण्याचा मान मिळवला आहे. त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
शुभम चिपळूणकर यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे पूर्ण केले त्यानंतर कराड येथे डिप्लोमा साठी प्रवेश घेत डिप्लोमा पूर्ण केला. पुढे डी वाय पाटील महाविद्यालय कोल्हापुर येथून आर्किटेक डिग्री संपादन करत यश प्राप्त केले.
बाळाराम चिपळूणकर यांचे दुसरे सुपुत्र ऋषिकेश चिपळूणकर हे गुरुकुल मधून बीएमएस ग्रज्युएशन करत पुढे यांनी सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड इथून एल एल बी शिक्षण पूर्ण करून वकील होण्याचा मान पटकावला आहे. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून हे यश संपादन केले आहे. या दोन्ही सुपुत्रांचे अभिनंदन करण्यासाठी खास अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस किशोर पालशेतकर, जिल्हा सरचिटणीस अनिल सावर्डेकर व तालुका अध्यक्ष अमित चिपळूणकर यांनी त्यांचे खास अभिनंदन केलेले आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.












