महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष किरण रेवाळे यांचे आयोजन
संतोष कोत्रे लांजा -: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष किरण प्रभाकर रेवाळे यांच्या वतीने भांबेड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य नांगरणी स्पर्धेत घाटी गटात संगमेश्वर येथील केदारलिंग प्रसन्न दत्ताराम गुरव यांच्या गाडीने तर गावठी गटात चिपळूण सावर्डे येथील केदारबाजी प्रसन्न -रुद्र शिंदे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे विशेष बक्षीस असलेल्या मोटरसायकलचा मानकरी ठरले लांजा तालुक्यातील देवधे येथील गुरव गावकर.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष किरण रेवाळे यांच्या वतीने दरवर्षी ही भव्य दिव्य नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात येते.यावर्षी देखील ही स्पर्धा नुकतीच भांबेड येथे पार पडली. या स्पर्धेत १०० हून अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले होते.
प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या या स्पर्धेत घाटी गटामध्ये संगमेश्वर तालुक्यातील केदालिंग प्रसन्न दत्ताराम गुरव यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक राजापूर ओणी यथील संजू जड्यार यांनी तर तृतीय क्रमांक लांजा तालुक्यातील देवधे येथील सोंबा महादेव प्रसन्न
त्यांच्या गाडीने पटकावला. चौथा क्रमांक ऋषभ पडये संगमेश्वर, पाचवा क्रमांक बाबाशेठ गांधी वेरवली लांजा, सहावा क्रमांक चिपळूण तालुक्यातील नायशी येथील कार्तिकी खोपे, त्याचप्रमाणे सातवा क्रमांक लांजा तालुक्यातील कुरचुंब येथील द्वारकानाथ माने, आठवा क्रमांक भांबेड येथील गांगेश्वर प्रसन्न यांनी, नववा क्रमांक संगमेश्वर आरवली येथील स्वराज गुरव यांनी तर दहावा क्रमांक लांचा आडवलीतील गांगेश्वर प्रसन्न यांनी पटकावला.
त्याचप्रमाणे गावठी गटामध्ये चिपळूण सावर्डे ल केदारबाजी प्रसन्न रुद्र शिंदे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक पिंपळी चिपळूण येथील आई सुकाई देवी प्रसन्न यांनी तर तृतीय क्रमांक संगमेश्वर कासे येथील वाघजाई प्रसन्न यांनी पटकावला. चौथा क्रमांक संगमेश्वर मारलेश्वर येथील बाबा गुरव यांच्या गाडीने पटकावला.तर पाचवा क्रमांक लांजा केळंबे येथील विठ्ठलादेवी प्रसन्न यांनी, सहावा क्रमांक संगमेश्वर चोरवणे येथील आई जुगाई जय हनुमान प्रसन्न यांनी. सातवा क्रमांक चिपळूण कुंभार्ली येथील आई महाकाली प्रसन्न तर आठवा क्रमांक संगमेश्वर कासे येथील वाघजाई प्रसन्न यांनी पटकावला. नववा क्रमांक संगमेश्वर देवरुख येथील सोळजाई प्रसन्न दुर्वेश शिंदे यांनी तर दहावा क्रमांक विभागून चिपळूण शिरवली येथील भैरी चंडिका प्रसन्न आणि लांजा गोविळ दत्त साई कन्स्ट्रक्शन प्रशांत झोरे यांच्या गाडीने पटकावला.
घाटी आणि गावठी अशा दोन्ही गटातील प्रथम विजेत्यांना प्रत्येकी रुपये २० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय विजेत्यांना प्रत्येकी १५,०००, तृतीय विजेत्यांना प्रत्येकी १०,०००, त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकाच्या विजेतांना प्रत्येकी ७०००, पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ५०००, सहाव्या विजेतांना प्रत्येकी ३०००, सातव्या क्रमांकाला विजेत्यांना प्रत्येकी २०००, आठव्या क्रमांकांना प्रत्येकी दोन, नवव्या क्रमांकांना प्रत्येकी दोन आणि दहाव्या क्रमांकांना प्रत्येकी दोन याप्रमाणे पारितोषिक देण्यात आली.
सर्व विजेत्या स्पर्धकांना तसेच बाईकच्या विजेत्या स्पर्धकांना प्रभाकर रेवाळे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे किरण रेवाळे यांच्यासह पिंट्या मटकर, भाई कानडे, सारीम वाघू, संजय गवळी, बाबा गांधी, आशिष कानसे, सुजल रसाळ, मनोहर कुलये यांनी मेहनत घेतली.