आंबेवाडीतील कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धेत चिपळूणचे वर्चस्व

दसपटी चिपळूण संघ प्रथम विजेता
न्यू हिंद विजय चिपळूण संघ उपविजेता

राजापूर प्रतिनिधी:  शहरातील आंबेवाडी येथे कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धेच्या चुरशीच्या झालेल्या सामन्यात अंतिम न्यू हिंद विजय चिपळूण संघावर मात करत दसपटी चिपळूण संघाने प्रथम क्रमांक पटकावल कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठानच्या चषकावर आपले नाव कोरले. तर न्यू हिंद विजय चिपळूण संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे स्पर्धेचे हे १२ वे वर्ष होते. या स्पर्धेत जिल्हयातील २० निमंत्रित संघांनी सहभाग नोंदविला होता. तीन दिवस या स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेचा सांगता समारंभ बुधवारी रात्री मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना न्यू हिंद विजय चिपळूण विरुद्ध कालिका मिरजोळे रत्नागिरी यांच्यामध्ये झाला. यामध्ये न्यू हिंद विजय चिपळूण संघाने बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दसपटी चिपळूण विरुद्ध महाकाली कुंभार्ली चिपळूण यामध्ये झाला या अडीतटी च्या लढतीत दसपटी चिपळूण संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
अंतिम सामना दसपटी चिपळूण विरुद्ध विरुद्ध न्यू हिंद विजय चिपळूण या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात शेवटच्या पाच मिनिटात दसपटी संघाने न्यू हिंदवी विजय चिपळूण संघावर एकतर्फी विजय संपादन केला. तर तृतीय क्रमांक महाकाली कुंभार्ली चिपळूण व चतुर्थ क्रमांक रत्नागिरी
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ नगरसेवक एड. जमीर खलिफे, संदेश करगुटकर, सुशांत मराठे, शैबाज खलिफे, सतीश बडबे, अविनाश लोळगे, नगरसेवक सुबोध पवार, शिवा पवार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख पारितोषीक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभाच्या दिवशी शिवसेना युवा नेत्या अपुर्वा सामंत यांनी स्पर्धास्थळी भेट दिली व मंडळाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कै. सुहास लोळगे स्मृती प्रतिष्ठान आंबेवाडी च्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेचे सूत्रसंचालन देवेंद्र गाडी यांनी पाहिले. तीन दिवस चालेल्या या स्पर्धेचे प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबध्द असे नियोजन केले होते. या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट दिली व शुभेच्छा दिल्या.