गौरव पोंक्षे : माखजन
कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षकपदी आस्थापना विभागात मुख्य लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या श्री महेश सावंत यांचे कडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.याआधी आस्थापना विभागात मुख्य लिपिक म्हणून काम पाहताना श्री महेश सावंत यांचेकडे कोल्हापूर विभागाची उच्च माध्यमिक विभागाची जबाबदारी होती.
सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या श्री हणमंत बिराजदार यांची कोल्हापूर जिल्हा परिषदे कडे पदोन्नत्ती बदली झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.या रिक्त पदाचा संपूर्ण कार्यभार शिक्षण क्षेत्रातील अतिशय अनुभवी अशा श्री महेश सावंत यांचे कडे देण्यात आला आहे.
श्री महेश सावंत हे गेली अनेक वर्षे कोल्हापूर उपसंचालक येथे कार्यरत असून,शिक्षण क्षेत्रातील अचूक ज्ञान त्यांना अवगत आहे.शिवाय शिक्षण विभागाच्या विविध शासन निर्णयांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे.कोल्हापूर उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर सह रत्नागिरी,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग येथील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.त्यांच्या कडे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक पदाचा कार्यभार आल्यावर संघटनेचे भारत शिरगावकर व सहकारी शिक्षक यांनी भेट घेत अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.यावेळी वरिष्ठ लिपिक लक्ष्मण पवार देखील उपस्थित होते.












