10 हजारांच्या गांजा सह एकावर रत्नागिरी शहरात कारवाई

रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेकायदेशिरपणे गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.15 वा.करण्यात आली असून संशयिताकडून 10 हजारांचा 168 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
सिकंदर जलील शहा (45,रा.पोस्ट ऑफीस समोर लिमये कंपाउंड,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेड काँस्टेबल गणेश सावंत यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी संशयित सिकंदर शहा हा पोस्ट ऑफीस समोरील पार्किंगमध्ये आपल्या ताब्यात 168 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात एनडीपीएस अ‍ॅक्ट 1985 चे कलम 8(क),20(ब)2(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.