पोलीस घटनास्थळी दाखल.
ओटवणे (प्रतिनिधी )
विलवडे वडाकडील दोन भुषारी दुकाने आणि सलून मध्यरात्री चोरट्याने फोडून ऐवज लंपास केला यामधून चोरट्याच्या हाती किती मुद्दे माल लागला हे पोलीस तपासात सिद्ध होणार असून पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे ही तिन्ही दुकाने भर वस्तीत असूनही चोरट्याने शीताफिने चोरी केली असल्याने आणि हे प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनेची माहिती सरपंच प्रकाश दळवी यांनी पोलीस स्थानकात कळविताच पोलीस कॉन्स्टेबल आर. बी. तेली हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा झाल्यानंतर नेमका प्रकार उघडकीस येणार आहे.











