स्थानिक निवडणुकांचा निर्णय मुंबई वरिष्ठ घेतील
राजन तेलींच्या प्रवेशाने शिवसेनेला जिल्ह्यात बळकटी;
जिल्ह्यातील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न
कणकवली
महायुती म्हणून जिल्ह्यातील जनतेने तीनही राणेंना जिंकून दिले. त्यामुळे जिल्ह्यातील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आमचे काम चालु आहे. दस-याच्या मुहुर्तावर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी माजी आ. राजन तेली यांना पक्षात प्रवेश दिला. ते मुळ शिवसेनेचेच होते , त्यामुळे ते स्वगृही परतले आहेत.आज हा शिवसेनेचा परिवार राजन तेली यांच्या माध्यमातून वाढला आहे. शिवसेनेत राज्यात आणि जिल्ह्यात सर्वात जास्त प्रवेश होत आहेत. आमचे “ऑपरेशन टायगर” सुरू आहे.तेली आलेत अजून कोण कोण येतील ते येत्या काही दिवसात कळले.असे शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधताना व प्रकरणाशी बोलताना केले.
आमदार राजन तेलींच्या रुपाने एक शिवसेनेला जिल्ह्यात नेता मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत संघटनात्मक बांधणी होणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूकांमधील महायुतीबाबत निर्णय मुंबईत होईल , अशी माहिती आ.निलेश राणे यांनी दिली.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी माजी आ. राजन तेली , उपनेते संजय आग्रे , संजय पडते , विधानसभा प्रमुख संदेश पटेल , युवासेना जिल्हाप्रमुख मेहूल धुमाळे , तालुकाप्रमुख दामू सावंत , मंगेश गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते .
जिल्ह्यात सावंतवाडी , बांदा , कुडाळ , कणकवली याठिकाणी राजन तेली यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेना उतरली आहे. खा. नारायण राणे यांच्या समवेत काम करत असल्यामुळे राजन तेली यांना अनेक वर्षांपासून गावाची माहिती आहे. या वयातही तरुणांना लाजवतील असे गावागावात ते जात आहे. आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगला नेता दिला आहे.युती होईल , नाही होणार हा वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे. मात्र, खा. नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिळून निर्णय घेतील. महायुतीतील मित्र पक्षाला त्रास होणार नाही असे काम करीत आहोत.माझ्या मतदारसंघात विकासाचा बॅकलॉक आहे , ती कामे करत आहोत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामासाठी जेवढा निधी आणता येईल तेवढे काम केले जाणार आहे.
निलेश राणे म्हणाले , राजन तेली यांचा प्रवेश झाल्यानंतर अनेक लोक शिवसेनेत येणार आहेत. त्यांचे फोन येत आहेत. जे जे पक्षात येतील , त्यांना मान , सन्मान आणि आदर देण्याची जबाबदारी व आदर होणार हा त्यांना विश्वास आहे.शिवसेनेत कसलीही अट न ठेवता प्रवेश होत आहेत.राजन तेली आल्यामुळे अनेकांचे दरवाजा उघडले आहेत. आगामी काळात जिल्ह्यात विविध प्रवेश होतील.
राजन तेली म्हणाले , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो, मला शिवसेना पक्षात प्रवेश दिला. आ. निलेश राणे आणि आ. दीपक केसरकर यांना धन्यवाद देतो. आता शिवसेना वाढली पाहिजे.कारण कोकण म्हटल्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे गावागावांत संघटना वाढली पाहिजे. गावागावांत जावून तिथल्या कार्यकर्त्यांना भेटून स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याचे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे. तहसिलदार असेल पोलीस स्टेशन किंवा आरोग्य विभाग असेल शिवसैनिकांनी धावण्याची गरज आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात गावनिहाय दौरा निश्चित करा , मी रात्रंदिवस तुमच्या सोबत फिरायला तयार आहे. संघटना नसली तर महायुतीत उमेदवारी कशी मिळणार ? आता निवडणूका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे सर्वांनी मेहनत केली तरच यश मिळेल.












