कणकवलीत ४ ऑक्टोबरला भव्य रांगोळी स्पर्धा

‘विकसित भारत सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भाजप शहर मंडळाचा उपक्रम; शालेय व खुल्या गटात स्पर्धा

कणकवली : कणकवली भाजपा शहर मंडळाच्या वतीने ‘विकसित भारत सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कणकवली येथील भालचंद्र महाराज मठ येथे ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेत शालेय गट आणि खुला गट अशा दोन गटांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास २ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास १ हजार ५०० रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

खुल्या गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास १ हजार ५०० रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सुप्रिया नलावडे (९४२२०७०३४०), आर्या राणे (९७६३०३०१५२) किंवा मनस्वी ठाणेकर (७०५७५३२००७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली शहर भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.