चिपळूण (प्रतिनिधी) : श्रीराम सोतोकन कराटे दो आणि कुबुडो असोसिएशन ठाणे (डी आयव्हीए ) च्या एकूण ३९ विद्यार्थ्यांनी सांताक्रुज पश्चिम येथील इंडियन एअरलाइन्स आयडियल स्कूलमध्ये झालेल्या ९ व्या अंतर जिल्हास्तरीय कॅम्पो चॅम्पियनशिप मध्ये एकूण ६० पदके जिंकून दिवा शहराचे नाव उंचावले आहे.
क्रिश मुदलियान, नमिष चौगुले,ओम सोनवणे, विहान पिंपळे, रुद्र उत्तेकर, प्रत्युष बेल्यूस, अर्णव बोटले, सचिन देवदे, वैष्णव पानमाड, इमानुएल विनोदकुमार, वंश अडकर, विघ्नेश धनवे, स्वयाली पाले, यामी गुप्ता, प्रतिभी दोआरी, वेदाश्री पेडणेकर, रुजूला मोरे, सार्थक गमरे, रोनी वर्मा आणि आदित्य शेट्टी, श्रेया साव यांनी सुवर्णपदक युविका पाटील, अवनी कदम, लावण्या पांचाळ, स्वरा वाडकर, रुद्र चाळके, स्वरा कुवर, विराज पटवा, ऋषभ शिंदे आणि कनिष्क प्रजापती यांनी रौप्य पदक जिंकून शाळेचे नाव उंचावले. तसेच समर्थ गुंजल, अश्विन सिंह,सोहम जावले, आयुष गुप्ता, योगेश राठोड, श्रावणी बोडके, मयंक सिंह, मयंक मोरे यांनी कास्यपदक पटकावले. के ई एम पी ओ महाराष्ट्राचे सहसचिव शिहान ऋषिकेश श्रीराम भगवत यांनी सर्व विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कठोर परिश्रमाचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले.सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी सर्व विद्यार्थी संस्थेचे कर्मचारी आणि या महत्त्वाच्या स्पर्धेत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानले. ज्यात सोके डॉ. जगदीश सिंह शिहान विजय सिगवान (के ई एम पी ओ महाराष्ट्राचे सचिव) आणि शिहान मेलविन जोसेफ( केईएमपीओ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष) यांचा समावेश आहे.










