आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली नियुक्ती
आमदार निलेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना मालवण शहर मच्छिमार आघाडी प्रमुखपदी मालवण धुरीवाडा येथील वसंत देवेंद्र गावंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्ती जाहीर केली. आमदार निलेश राणे यांनी वसंत गांवकर यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, शहर संघटक राजू बिडये, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, जिप माजी सभापती संतोष साटविलकर, मालवण पंचायत समिती माजी सभापती सुनील घाडीगावकर, मच्छिमार सेल तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, सुशांत घाडीगावकर, मंदार लुडबे, उद्योजक बाबू धुरी, शहर सचिव महेश सारंग, कोषध्यक्ष आबा शिरर्सेकर, शाखा प्रमुख शिवाजी केळुसकर, संदीप धुरी, उपशहर प्रमुख दत्ता केळुसकर, नागेश वेंगुर्लेकर, गणेश परब, एकनाथ मोहिते, सिद्धेश पातडे, किरण जोगी, गौरव सावबा, गजानन पराडकर, गितेश पराडकर, विश्वजित मणचेकर, शुभम सावंत, प्रथम सारंग, अनिकेत खडपकर यांसह अन्य सहकारी उपस्थित होते.
वसंत गांवकर यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आपली नियुक्ती करण्यात येत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे नियुक्ती पत्र देण्यात आले.












