दापोली Breaking : पंचायत समितीच्या 12 गणांचे आरक्षण जाहीर

दापोली (विशेष प्रतिनिधी): दापोली पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठीचे गटनिहाय आरक्षण  जाहीर झाले आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. एकूण १२ गणांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:

१. सर्वसाधारण प्रवर्ग (Open)

* जुंईकर मोहल्ला

* पालवण

* जालगाव

* टेटवली

* पांगरी (तर्फ हेवली)

२. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

* केळशी

३. नागरिकांचा मागास प्रवर्ग – स्त्री (OBC Woman)

* कोळबांद्रे

* चिकलेवणे

४. सर्वसाधारण प्रवर्ग – स्त्री (Open Woman)

* खेर्डी

* बुरोंडी

* दाभोळ

५. अनुसूचित जमाती प्रवर्ग – स्त्री (ST Woman)

* हर्णे

आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता कोणत्या गणातून कोणता उमेदवार निवडणूक लढवणार, याकडे दापोलीकरांचे लक्ष लागले आहे. पक्षीय स्तरावर पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी चर्चांना सुरुवात झाली आहे.