दोडामार्ग l प्रतिनिधी : दोडामार्ग तालुका पंचायत समितीचे आरक्षण आज तहसीलदार कार्यालयात जाहीर करण्यात आले. या आरक्षणात बऱ्याच इच्छुकांचा पत्ता कट झाल्याचे दिसत आहे. तर आरक्षण बदलामुळे नवीन चेहऱ्याना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोडामार्ग सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असून कोनाळ, माटणे व झरेबांबर या मतदारसंघातील विजयी उमेदवाराला सभापतीची पदाची संधी मिळणार आहे. प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले.
दोडामार्ग पचायत समिती आरक्षण पुढील प्रमाणे : साटेली भेडशी – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, झरेबांबर – सर्वसाधारण महिला, कोनाळ – सर्वसाधारण महिला, माटणे – सर्वसाधारण महिला, कोलझर – सर्वसाधारण, मणेरी – सर्वसाधारण प्रवर्ग.
दोडामार्ग सभापती पदासह सर्व मतदार संघाचे आरक्षण जाहीर झाल्याने सर्वच पक्षात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आपला उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षात चढाओढ लागल्याचे चिन्ह आहे.










