साई काणेकर मित्रमंडळाचे आयोजन
बांदा l प्रतिनिधी :बांदा येथील साई काणेकर मित्रमंडळ आयोजित गणेश सजावट स्पर्धेत अनुज बांदेकर तर गणेश मूर्ती सजावट स्पर्धेत कांता हळदणकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मित्रमंडळाच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

साई काणेकर मित्र मंडळाच्या वतीने गणेश सजावट व गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्रमांक ५ साठी करण्यात आले होते. स्पर्धेला स्थानिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे परीक्षण करून विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके वितरित करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे गणेश सजावट स्पर्धा – प्रथम क्रमांक अनुज बांदेकर, द्वितीय नेहा मेस्त्री, तृतीय यश शिरोडकर. (गणेश मूर्ती सजावट स्पर्धा) प्रथम क्रमांक कांता हळदणकर, द्वितीय सिद्धू आजगावकर, तृतीय प्रदीप वाळके.
सदर स्पर्धा हॉस्पिटल कट्टा, काळसेवाडी, सुतारवाडी व आंबेडकर नगर साठी मर्यादित होती. ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी भाऊ वाळके, प्रशांत कोचरेकर, परीक्षक केदार कणबर्गी उपस्थित होते.









