अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट : नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी
वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० जागांसाठी आज आरक्षण जाहीर झाले. या नव्या आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाले आहेत. तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. असे असले तरी युती आणि आघाडीची भूमिका त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
वेंगुर्ले तहसील कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्या उपस्थितीत तहसीलदार ओंकार ओतारी यांनी हे आरक्षण जाहीर केले. यावेळी नायब तहसीलदार राजन गवस उपस्थित होते. तसेच झालेल्या या आरक्षण सोडतीवेळी भाजपा तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब, शिवसेना तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, माजी उपसभापती सिद्धेश परब, भाजपा तालुका चिटणीस समिर कुडाळकर, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, केळूस सरपंच योगेश शेट्ये, आरवली सरपंच समिर कांबळी, भाजपा चे कमलेश गावडे, प्रसाद पाटकर, भूषण सारंग, सुभाष सावंत, सुधीर धुरी, विशाल बागायतकर यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वेंगुर्ले तालुक्यातील जि. प. व पं. स. आरक्षण खालील प्रमाणे
*रेडी जि. प. : सर्वसाधारण*
रेडी : सर्वसाधारण महिला
शिरोडा : सर्वसाधारण महिला
*उभादांडा जि. प. : सर्वसाधारण*
उभादांडा : सर्वसाधारण महिला
आसोली : सर्वसाधारण
*तुळस जि. प. : सर्वसाधारण महिला*
तुळस : ना.मा. प्र. महिला
मातोंड : ना.मा. प्र.
*आडेली जि. प. : सर्वसाधारण*
आडेली : सर्वसाधारण
वायंगणी : सर्वसाधारण महिला
*म्हापण जि. प. : सर्वसाधारण महिला*
म्हापण : सर्वसाधारण
परुळे : सर्वसाधारण













