रत्नागिरी सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या शाळेचा विद्यार्थी *साहिल देवरुखकर* याची *विभागीय स्तरावरील कबड्डी* स्पर्धेसाठी निवड झाली आहे. साहिलने तालुका व जिल्हास्तरावरील सामने उत्तम कामगिरीने जिंकून विभागीय स्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे.
या यशामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक मा. महेंद्र पवार सर यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. साहिलच्या अथक मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे हे फलित असून, त्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका. संजना तारी, संस्थेचे पदाधिकारी, शाळेतील शिक्षकवृंद, आणि पालकवर्ग यांच्यातर्फे त्याचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले.
साहिलच्या या निवडीमुळे विद्यालयाचे नाव उज्वल झाले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विभागीय स्पर्धेमध्येही तो असाच उत्कृष्ट कामगिरी करील, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे.












