बांदा : प्रतिनिधी
राहत्या घराची भिंत कोसळून नुकसान झालेल्या शेर्ले – सिद्धार्थ नगर येथील शंकर उर्फ गुंडू जाधव यांना शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.
महिनाभरापूर्वी मुसळधार पावसात शंकर जाधव यांच्या घराची मातीची भिंत कोसळली होती. यात जाधव कुटुंबीयांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले होते. या घटनेची दखल घेत शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांना आर्थिक मदत दिली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, शेर्ले सरपंच सौं. प्रांजल जाधव, शिवसेना महिला उप तालुका प्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य सौ. श्रावणी धुरी, बाबा धुरी, शिवसेना मागासवर्गीय सेल युवा तालुका प्रमुख प्रशांत जाधव, चैताली जाधव आदी उपस्थित होते.












