रत्नागिरीच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे नगर पालिका प्रशासनाकडून स्वागत

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे जिल्ह्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या प्रशासनाच्या वतीने नुकतेच स्वागत करण्यात आले.

यावेळी देवरूख नगर पंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. या प्रसंगी रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, लांजा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार आणि गुहागर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण हे देखील उपस्थित होते.