केंद्रशाळा सुरंगपाणीच्या विद्यार्थ्यांना उद्योजक पुष्कराज कोले यांजकडून दिपावलीनिमित्त अनोखी भेट

सुप्रसिद्ध उद्योजक श्री पुष्कराज कोले साहेब यांनी केंद्रशाळा सुरंगपाणी शाळेला भेट दिली.दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या मातोश्री कै. श्रीमती माया रामकृष्ण कोले यांच्या स्मरणार्थ सुरंगपाणी शाळा व अंगणवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकवृंदाला सुगंधी उटणे,मोती साबण, पणत्या,भेटवस्तू, ड्रायफ्रूट्स व टोपी अशा विविध वस्तू वितरीत करण्यात आल्या.

श्री पुष्कराज कोले यांनी ग्रामीण भागातील शाळा असूनही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भरारी घेणाऱ्या शाळेचे भरभरून कौतुक केले. तसेच शाळेच्या अत्यावश्यक भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी आपला सिंहाचा वाटा असेल असे आश्वासन दिले .

यावेळी मुलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.या अनोख्या भेटीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम शामल मांजरेकर – पिळणकर,शाळा व्यवस्था -पन समिती अध्यक्ष श्री अमित कोरगांवकर, उपाध्यक्षा श्रीम वैष्णवी विक्रांत पेडणेकर, माजी अध्यक्ष तथा शिक्षणप्रेमी श्री प्रवीण राजापूरकर व पालक यांनी आभार मानले.