मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उपक्रमांतर्गत आयोजन
मसुरे | झुंजार पेडणेकर : “सर्वांची योजना, सर्वांचा विकास” उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल येथे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची बालसभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक वृंद यांनी उपस्थित बालचमुं सोबत शैक्षणिक संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांकडून आवश्यक शालेय गरजा जाणून घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली.
सदर बालसभेला ग्रामपंचायत सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, ग्रा.पं.
सदस्य श्री. साबाजी गावडे, जि. प. शाळा मुख्याध्यापक श्री. संतोष पाताडे, श्री. काशिनाथ पाताडे, श्री. चेंडगे सर, श्री. खिल्लारे सर, शिक्षक वृंद श्रीम. पावसकर मॅडम, श्रीम. देशमुख मॅडम, श्री. जाधव सर तसेच शाळेतील विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.












