अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात दिपावाली निमीत्त शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवा!

मसुरे | झुंजार पेडणेकर
दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर सालाबादाप्रमाणे यंदाही येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात अक्कलकोटचे संगीत अलंकार व वेदशास्त्र संपन्न मनोहर देगांवकर व डॉ.संतोष देगांवकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात दि.२०, २१, २३, २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ : १५ ते सकाळी ८ या वेळेत पहाटगाणी व दि. २०, २१, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:१५ ते ७:३० या वेळेत अभंग संद्या या स्वरुपातून शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवा संपन्न होणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी गायन सेवा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.