प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल २१ विद्यार्थी पात्र
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांतील सातत्यपूर्ण यशामुळे नावलौकिक प्राप्त झालेल्या सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, सावंतवाडीने यंदाच्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेचे एकूण २१ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, २१ विद्यार्थी पात्र करणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून या शाळेने मानाचा बहुमान मिळविला आहे.
यंदा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत – धारा महेंद्र कोरगावकर, वेद गोपाळ गवस, चेतन्य प्रदीप सावंत, कृष्णा उमेश पायशेट, रत्नाराम सोपाराम रबारी, चैत्राली लक्ष्मण काळे, कौस्तुभ कृष्णा पास्ते, श्रेष्ठ विठोबा कडव, सार्थक धोंडी वरक, अवनी प्रताप आवटे, कौशल सदगुरू मसुरकर, सार्थक शांताराम नाईक, गार्गी रुपेशकुमार गुंजाळ, संकेत शरद परब, शौर्य विशाल अपराध, गार्गी विशाल पई, नील रामचंद्र धुरी, नीरजा अभय चव्हाण, अर्णव रामदास कोरगावकर, तन्वी दीपक सरमळकर आणि युवानी शंकर पांगम हे विद्यार्थी पात्र झाले आहेत.
चार भिंतींच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञान, कला, क्रीडा, संस्कार व स्पर्धा परीक्षांचे उत्कृष्ट प्रशिक्षण देणारी ही शाळा म्हणून जिल्ह्यात ओळखली जाते. स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने उल्लेखनीय व ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या या शाळेने यंदाही आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत २०० हून अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, विज्ञान, पर्यावरण व व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक उपक्रम नियमितपणे राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असून, पालकांचा शाळेवर वाढता विश्वास कायम आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच शाळेचे संस्थेचे संचालक श्री. शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, सर्व संचालक, केंद्रप्रमुख श्री कमलाकर ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, सर्व शिक्षक, पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण, उपक्रमशील आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने उत्कृष्ट यश संपादन करणारी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, सावंतवाडी ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली अग्रगण्य शाळा म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.











