सुवर्ण योगाचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा : माजी आमदार शंकर कांबळी

शिरोडा येथे शासनातर्फे ‘अकाउंट एक्झिक्युटिव्ह’ अभ्यासक्रमाला प्रारंभ…

वेंगुर्ले : दाजी नाईक
‘अकाउंट एक्झिक्युटिव्ह हा शासनातर्फे सुरू होत असलेला अभ्यासक्रम म्हणजे सुवर्णयोग आहे. विद्यार्थी मित्रांनो या योगाचा अवश्य फायदा घ्या आणि नव्या वाटा शोधून प्रगती करा असे आवाहन माजी आमदार व गुरुवर्य वि.स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. शंकर कांबळी यांनी शिरोडा येथे बोलताना केले.
केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र यांचे मार्फत अकाउंट एक्झिक्युटिव्ह या शासनमान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमा चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. इनोव्हीजन लिमिटेड शिरोडा आणि बा. म. गोगटे कनिष्ठ महाविद्यालय शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. शंकर कांबळी अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर शिरोडा उपसरपंच श्री चंदन हाडकी, आरवली सरपंच श्री समीर कांबळी, आजगाव सरपंच सौ. यशश्री सौदागर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एम.एन. कांबळी, वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे संचालक श्री. महाले सर, श्री. राजेंद्र कांबळी, श्री प्रदीपकुमार प्रभू, आऱवलीचे श्री बबन नाईक उपस्थित होते.

श्री पंणशीकर सर यांनी सर्वांचे स्वागत केले व पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री. मनोज शारबिद्रे यांनी प्रास्ताविकात या कोर्स संदर्भात माहिती दिली. त्यानंतर सौ यशस्वी सौदागर, श्री समीर कांबळे तसेच श्री चंदन हाडकी व सी एम एन कांबळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पणशीकर सर यांनी केले तर श्री.शारबिद्रे सर यांनी आभार मानले. ज्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आपल्या सोबत ९५५२६४५३९३ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा तेजस्वी कॉम्प्युटर्स गांधी चौक शिरोडा या ठिकाणी भेट द्यावी असे आवाहन इनोव्हिजन लिमिटेड शिरोडा चे संचालक श्री मनोज शारबिद्रे केले आहे.