होडावडा तळवडा गावांचा संपर्क तुटला
वेंगुर्ले : दाजी नाईक l वेंगुर्ले सावंतवाडी या मार्गावरील होडावडा येथील मुख्य पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच या पाण्यामुळे होडावडा आणि तळवडा या गावाचा संपर्क तुटला आहे. दरवर्षी सलग दोन दिवस मोठा पाऊस झाला तर या फुलावर पाणी येते. हे फुल रस्त्याच्या लेव्हलला असल्यामुळे नदीला पूर आला की हे फुल पाण्याखाली जाते. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान नदी वाद असल्याने आजूबाजूच्या शेतातही हे पाणी घुसले आहे.