मुणगे कातकरी वस्तीत फराळ वाटप!

मसुरे | झुंजार पेडणेकर :        देवगड तालुक्यातील मुणगे येथील कातकरी समाज वस्तीत पहिल्यांदाच दिवाळी निमित्ताने आडबंदर कारीवणे पोलीस पाटील श्री तुषार आडकर आणि ग्रा सदस्या सौ.रवीना मालाडकर यांच्या सौजन्याने येथील ग्रामस्थांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करून दिवाळीच्या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. कातकरी वस्तीतील ग्रामस्थांना दिवाळी निमित्ताने अशी आगळीवेगळी भेट पहिल्यांदाच मिळाल्याने त्यांचा आनंद हा एक पर्वणीच ठरला. या नवीन उपक्रमाबद्दल मुणगे सोसायटी चेअरमन श्री.गोविंद सावंत, समाजसेवक आनंद मालाडकर यांनी अभिनंदन केले.