बांदा नरकासुर स्पर्धेत माऊली स्पोर्ट्स पेडणे संघ विजेता

बांदा मर्यादित स्पर्धेत श्रीदेव बनखनकर मंडळ प्रथम

बांदा : प्रतिनिधी
येथील आमची वाडी देऊळवाडी आयोजित नरकासुर स्पर्धेत माऊली स्पोर्ट सांस्कृतिक क्लब पेडणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना शैलेश लाड पुरस्कृत १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. दळवीवाडा कला क्रीडा मंडळ माजगाव उपविजेते ठरले. त्यांना द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले या स्पर्धेला गोवा व सिंधुदुर्गातील मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.

आमची वाडी देऊळवाडी आयोजित नरकासुर स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, भाजप महिलाध्यक्षा श्वेता कोरगावकर, उपसरपंच राजाराम धारगळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, साई काणेकर, सामाजिक कार्यकर्ते शैलेश केसरकर, मंदार कुडव, पत्रकार निलेश मोरजकर, लवू परब आदी उपस्थित होते.

बांदा मर्यादित नरकासुर स्पर्धेत श्री देव बनखनकर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ काळसेवाडी, सुतारवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कट्टा कॉर्नर मित्र मंडळ द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. नरकासूर वध या देखाव्यामध्ये कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला मंडळतर्फे भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे परीक्षण आशिष सावंत, आकाश सावंत, गौरांग साळगावकर, देवेश वारंग यांनी केले. बांदा येथील स्टॅच्यू कलाकार प्रशांत सावंत यांनी सर्वांचे लक्ष वेधले. बांदा गावातील व परिसरातील हजारो प्रेक्षकांनी या स्पर्धेचा क्षण अनुभवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळाराम शिरोडकर, राकेश परब यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमची वाडी देऊळवाडी मंडळातील आबा धारगळकर, सिद्धेश शेवडे, राकेश परब, निलेश मोरजकर, सुनील माजगावकर, महादेव शेगडे, हर्षद कामत, गुरूनाथ साळगावकर, देवेश वारंग, आशिष सावंत, रोहन सुपल, आकाश सावंत, गौरांक साळगावकर, संकेत माजगावकर, मयूर परब,
सर्वेश मुळ्ये, निखिल साळगावकर, प्रथमेश साटेलकर, भाग्येश धुरी, भरत माजगावकर, रुपेश माजगावकर, सिद्धेश कोरगावकर, प्रसाद गवंडी, आशु माजगावकर, ऋषीकेश सावंत, तनय आरोलकर, अक्षय मयेकर, सुजल नाईक, भास्कर सावंत, प्रशांत सावंत यांनी परिश्रम घेतले.