गुहागर | प्रतिनिधी :
गुहागर-चिपळूण महामार्गावरील चिखली येथे सोमवारी दुपारी 4 च्या दरम्यान अंजनवेल ते रत्नागिरी मच्छी वाहतूक करणारा आयचर कंपनीचा टेम्पो क्रं(MH08AP2692) रस्त्यावर उलटला. या अपघातात टेम्पोचा क्लीनर किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो अंजनवेलकडून रत्नागिरीच्या दिशेने मच्छी घेऊन जात असताना, चिखली परिसरात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्यावर उलटला. अपघातामुळे टेम्पोतील सर्व मच्छी रस्त्यावर विखुरली गेली, तर टेम्पोचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघातात क्लीनर किरकोळ जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती अपघात ग्रस्त टेम्पो रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली.












