परुळे l प्रतिनिधी :कोकणातील सिंधुदुर्ग मध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे निसर्ग रम्य लोकेशनवर मराठी चित्रपटाचे काही चित्रीकरण पार पडले. यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीमधील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी भूमिका साकारल्या आहेत.
पावसाळा संपताच कोकणात चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा सुरू झाले आहे. खवणे येथील निसर्गरम्य लोकेशन वर मराठी चित्रपट चित्रीकरण पार पडले. एका नवीन मराठी चित्रपटाचे चित्रीकरण खवणे समुद्र किनाऱ्यासह आसपासच्या परिसरात संपन्न झाले. यावेळी मराठी चित्रपटा मधील आघाडीचा कलाकार अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांचा एकत्र असलेला काही भाग चित्रित करण्यात आला. खाडी किनारी बोट प्रवासासह काही क्षण चित्रित करण्यात आले. आता पाऊस थांबल्या मुळे कोकणात सिनेमांचे चित्रीकरण होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे एक प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. स्थानिक पातळीवर कलाकार उपलब्ध होऊन त्यांना आपल्या कला सादर करण्याची संधी अशा चित्रपटांमध्ये मिळत असते. कोकणातील बहुसंख्य निसर्गरम्य लोकेशन वर निर्माते चित्रीकरण करण्यासाठी येत असतात. त्यामुळे हा एक व्यवसाय पर्यटन वाडी साठी उपयोगी ठरत आहे.













