खांबाळेत दिवाळीत खाद्य महोत्सवाचे आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी: महिला बचत गटांच्या उत्पादनांची विश्वासार्हत बाजारपेठेत कायम आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना मागणी देखील मिळते. परंतु असे असले तरी बचत गटांनी बाजारपेठेची मागणी ओळखुनच दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करावी. उत्पादनाच्या दर्जाबरोबर पॅकिंग, ग्रेडिंगवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन तहसिलदार सुर्यकांत पाटील यांनी येथे केले
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानातर्गंत खांबाळे ग्रामपंचायत आणि सहेली ग्रामसंघाच्या माध्यमातुन खांबाळे ग्रामपंचायत आवारात दोन दिवशीय दिवाळी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसिलदार श्री.पाटील, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सरपंच प्राजक्ता कदम, निवृत्त कॅप्टन राजाराम वळंजु, ग्रामसंघाच्या अध्यक्ष सुनिता पवार, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, उपसरपंच मंगेश गुरव, नयना गुरखे आदी उपस्थित होते.
तहसिलदार श्री.पाटील म्हणाले, महिला बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी याकरीता दिवाळी खाद्य महोत्सवाची संकल्पना खरोखरच कौतुकास्पद आहे. या ग्रामपंचायतीचा आदर्श तालुका पातळीवर घेण्यात यावा आणि पुढच्या वर्षी पंचायत समिती आवारात अशा प्रकारे दिवाळीच्या दोन तीन दिवस अगोदर महोत्सव आयोजित करण्यात यावा असे त्यांनी सुचित केले. महिला बचत गटानी बाजारपेठेतील मागणीचे भान ठेवुन उत्पादनांची निर्मिती करा. जेणेकरून आपले नुकसान होणार नाही.
गटविकास अधिकारी श्री.जंगले म्हणाले, महिला बचत गटांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन पाठबळ देण्याच्या हेतुने दिवाळी खाद्य महोत्सवाची संकल्पना राबविण्यात आली. ही संकल्पनाच अतिशय स्तुत्य आहे. गावोगावी असे उपक्रम व्हायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री सोनवलकर म्हणाले, भेसळमुक्त उत्पादनांची गरज आज गरज आहे. प्रत्येक गोष्टीत भेसळीचे प्रमाण दिवसेदिंवस वाढत आहे.अशा वातावरणात महिला बचत गटांच्या उत्पादनांची विश्वासार्हता टिकुन आहे. त्यामुळे आपली उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचली पाहीजेत.
फोटो- खांबाळे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित खाद्य महोत्सवाचे उद्घाटन गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसिलदार सुर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सरपंच प्राजक्ता कदम, निवृत्त कॅप्टन राजाराम वळंजु,











