धूळ व खड्डे हीच सार्वजनिक बांधकाम खात्याचे दिवाळी गिफ्ट

दापोली प्रतिनिधी:-दापोली मतदारसंघात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांसाठी रस्त्यांमधील खड्डे व त्यातून होणारे धूळ ही खास अनोखी भेट देण्यात आली आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना दापोली व खेड सारख्या छोट्या शहरातही ग्रामीण भागात पूर्वीचे लाल मातीच्या रस्त्यावर असल्याचा असल्याचा भास यामुळे होत आहे. हे खड्डे बुजवण्याचा केवळ थट्टा मस्करीचा प्रयोग करत गणेशोत्सवात एका नाचकाम करणाऱ्या ठेकेदाराला खड्डे भरून त्याच्या बिलाची ही खास व्यवस्था करण्यात आली आहे.

दापोली- खेड या राज्य मार्गाबरोबरच दापोली- हर्णै या मुख्य राज्य मार्गावरील असलेले खड्डे व त्यावर असणारे असंख्य खड्डे त्यातून उडणारी धूळ याची भेट सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येणाऱ्या पर्यटकांना व नागरिकांना दीपोत्सवानिमित्त देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पर्यटक व नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आठवण काढत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही अनोखी भेट देण्याचा प्रयोग दापोली मतदारसंघात गणेशोत्सवात व दीपोत्सवात राबवण्यात आल्याचा प्रत्यय प्रत्येक नागरिकाला वाहनचालकांना येत आहे.

कोट्यावधी व लाखो रुपयांची टेंडर मॅनेज करून देणारे नेत्यांना मात्र राहूकेतूंना आणखी नवीन मोठ्या लाखो रुपयांच्या कामांचे टेंडर कसे मिळेल याची चिंता लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व काही नेत्यांकडून मॅनेजर ठेकेदार त्यांच्याकडून यापूर्वी करण्यात आलेले रस्ते त्यावर पडलेले खड्डे धूळ यामुळे नागरिक मात्र या अनोख्या भेटीने डोक्याला हात लावत आहेत

इतकच नाही तर खड्ड्यांमधूनही प्रवास करता यावा खडक प्रवास करताना उडणारी धूळ कशी उडते याचा प्रत्यय यावा पाठदुखी व कंबरदुखी यासारखे जीवघेणे आजार जडले की डॉक्टरांची पायरी चढायला लागावी यासाठी ही अनोखी भेट असल्याचं बोललं जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने नागरिकांना दिलेल्या या खास दिवाळीची गिफ्ट ची उपरोधिक चर्चा सध्या रंगली आहे.