दानपेट्या फोडणारा चोर दापोली पोलिसांनी पकडला

दापोली प्रतिनिधी:- रत्नागिरी जिल्ह्यात अनेक मंदिरांमध्ये दानपेटी फोडून चोरी करणारा अट्टल चोरट्या दापोली पोलिसांनी पकडला आहे. दापोली शहरातील एसटी स्टँडवर असलेल्या श्रीदत्त मंदिरात तो चोरी करताना आढळल्याने याची माहिती तात्काळ दापोली पोलिसांना देण्यात आली. ही माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या संशयित आरोपीचे ओम ढुंढरे राहणार तळेगाव पुणे असे नाव आहे. मंदिरामधील दानपेटी फोडणे हाच त्याचा चोरीचा उद्योग असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ओम ढुंढरे या दानपेट्या फोडणाऱ्या अस्सल चोरट्याकडून यापूर्वी अनेक मंदिर फोडण्यात आले आहेत. रत्नागिरी शहरातील रत्नागिरी कारागृहासमोरील महापुरुषाचे, दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील एका मंदिरात त्यांनी यापूर्वी चोरी केली आहे. प्रत्येक जिल्हा निवडून त्या त्या जिल्ह्यात जाऊन मंदिरांमधील दानपेट्या फोडतो अशी त्याची चोरीची पद्धत असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
दापोली शहरातील श्री राधाकृष्ण मंदिरातही हा चोरट्या दोन दिवसांपूर्वी चोरी करताना येथील संचालकांनी पकडला होता. मात्र तो निसटला होता त्यानंतर त्याने पाच पंढरी येथील एका मंदिरात दानपेटीतील पैशांची चोरी केली. त्याच्याकडून काही रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्यावर घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरट्याला दापोली न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत