लांजा (प्रतिनिधी) कॉलेज परिसर रहिवासी संघाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नगरपंचायत व महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार व दिवाळी भेट कार्यक्रम नुकताच पार पडला.
कॉलेज परिसर रहिवासी संघाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. यावर्षी देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महावितरणचे वायरमन तुषार कांबळे,पाणीपुरवठा कर्मचारी श्री नामये, श्री .मारळकर, नगरपंचायत स्ट्रीट लाईट देखभाल करणारे जयेश खावडकर , श्री. गुरव, घंटा गाडी चालक श्री.आग्रे यांचा सर्व सभासदांच्या वतीने दिनेश झोरे यांच्या निवासस्थानी सत्कार व दिवाळी भेट देण्यात आली.
याप्रसंगी कॉलेज परिसर रहिवासी संघाचे अध्यक्ष दिनेश झोरे ,उपाध्यक्ष दिलीप (भाई) चौगुले ,कोषाध्यक्ष चंद्रकांत कदम, जेष्ठ सभासद राजू प्रभुदेसाई, श्री.कुलकर्णी ,नचिकित शेट्ये, विलास गोरे ,शुभम चव्हाण, दिनेश चल्लावाड , राज गवाणकर, नागेश काटगाळकर आदी उपस्थित होते.











