सावंतवाडी : कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्गतर्फे “भव्य दिव्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २०२५” (सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित) येत्या रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सावंतवाडी बस स्टँडसमोरील काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत Sub Junior, Junior, Senior, Masters गटातील खेळाडू सहभागी होणार असून,
स्पर्धेमध्ये Strong Boy, Strong Girl, Strong Man, Strong Woman या गटांमध्ये विजेते ठरवले जातील.
विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि पदकांसह “Strong Man of Sindhudurg” व “Strong Woman of Sindhudurg” या विशेष किताबाने सन्मानित करण्यात येईल.
या स्पर्धेचे आयोजन जमील फ्लॉवर मर्चंट सावंतवाडी, जासीम सारंग यांनी दिवंगत कै. शंकर सिताराम धोगळे यांच्या स्मरणार्थ केले असून, कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक नामांकित खेळाडू उपस्थित राहणार आहेत. शक्ती, स्पर्धा आणि उत्साह यांचा संगम सावंतवाडीत रविवारी पाहायला मिळणार आहे!










