तब्बल चार तास नागरिक अडकून राहिले.
अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नागरिकांची सुटका.
प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापूर: कागल तालुक्यातील श्री गहिनीनाथ गैबीपीर ऊरूसास सुरुवात झाली आहे. बापूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या एका जायंट व्हील पाळण्यामध्ये (दि.२४) रोजी रात्री अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पाळणा बंद पडला. त्यात बसलेले १८ नागरिक तब्बल चार तास अडकून राहिले.
पाळणा क्षमतेच्या वर गेल्याने अडकून राहिला.ही अडक काढण्याचे पाळणा मालकाकडून प्रयत्न सुरू होते. तो निघाला पण अडीच ते तीन फूट खाली येऊन दुसऱ्या अडक मध्ये तो पुन्हा अडकला. यावेळी बसलेल्या माणसांचा झोला पाळण्याला सहन होईल की नाही ही शंका मालकांना आली. त्यातून त्यांनी दुसरा काय बचाव मार्ग करता येईल काय याची चर्चा सुरू केली.
मनीष रणभिसे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची विशेष परवानगी घेऊन सुमारे दीडशे फूट लांब जाणारी टर्न टेबल लँडर ही कोल्हापूर अग्निशमन दलाची क्रेन तातडीने कागलकडे पाठवून दिली.
सदर वर्दिवर स्थानिक अधिकारी ओंकार खेडकर, जयवंत खोत, वाहनचालक अमोल शिंदे, फायरमन प्रमोद मोरे,अभय कोळी यांनी कामगिरी बजावली
परिस्थितीचा अंदाज घेऊन कोल्हापूर मनपा अग्निशमन दल व बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून पाळण्यात अडकलेले सर्व नागरिक सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.













