डि .जे.सामंत लांजा, स्कुलचा शान बिरवाडकर विभागिय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी रवाना

लांजा (प्रतिनिधी) शहरातील डि . जे . सामंत इंग्लिश मिडियम स्कुल लांजाचा विद्यार्थी शान बिरवाडकर याची कराड येथे होणाऱ्या विभागिय बुध्दिबळ शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
डि . जे . सामंत इंग्लिश मिडियम स्कुल लांजा येथे इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या शान बिरवाडकर याने शालेय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर नंबर पटकावला होता. त्यामुळे कराड येथे होणाऱ्या विभागिय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली असून तो स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.
या यशाबद्दल त्याचे श्री साई एज्युकेशन सोसायटी, पाली संचलित डि. जे. सामंत इंग्लिश मिडियम प्रशालेचे अध्यक्ष आर.डि सामंत व दिपक कामत, सौ. समिक्षा कामत, संजय तेंडूलकर, जितेश गावकर आणि प्रशालेचे मुख्याध्यापक श्री उपाध्ये तसेच क्रिडा शिक्षिका कु. तेजस्विनी आचरेकर यांनी अभिनंदन केले.
तसेच शाळेतील शिक्षकवर्ग, इतर कर्मचारी
आई सौ . प्रियंका बिरवाडकर संस्थेतील पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.