सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १८ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. पाठीला पाठ लावून उभ्या असलेल्या या दोन गावचा पाठीराखा असलेल्या दोन पूर्वस देवस्थानच्या जत्रोसत्वाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मळगांव येथील दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. या देवस्थानच्या जत्रोस्तवानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री देवी माऊलीचे वाजगाजत आगमन, त्यानंतर श्री देवी माऊलीची ओटी भरणे, दोन पूर्वस देवाला केळी नारळ ठेवणे, नवस बोलण व फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत.
तर रात्री मंदिराभोवती भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
Sindhudurg