लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील रुण येथील श्री अचलेश्वर व श्री भैरी देवांचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव दिनांक ५ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे .
रुण गावचे ग्रामदैवत श्री देव अचलेश्वर आणि श्री भैरी देवांचा त्रिपुराई पौर्णिमा उत्सवानिमित्त दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता देवाला रूपे लावणे , दहा वाजता अभिषेक, महाआरती आणि तीर्थप्रसाद. दुपारी २ वाजता पूजा ओटी भरणे कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तुलसी विवाह आणि त्रिपुरोत्सव सोहळा( त्रिपुर पेटवणे ) साजरा करण्यात येईल. रात्री ८ ते १० या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री दहा वाजता माऊली महिला नमन मंडळ, रत्नागिरी यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले महिलांनी सादर केलेली चौरंगी नमनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे .
तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रूण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.













