नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयात नर्सिंग क्षेत्राविषयी मार्गदर्शन

गौरव पोंक्षे माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड.पी आर.नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांना नर्सिंग क्षेत्रातील करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी संगमेश्वर लोवले येथील नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग च्या प्रा.अंकिता झगडे,प्रा तेजश्री तिकुडवे उपस्थित होत्या.
यावेळी बारावी विज्ञान च्या विद्यार्थ्यांना बी.एस्सी नर्सिंग मधील करिअर विषयी मार्गदर्शन केले.बी एस एस्सी नर्सिंग केल्यावर असलेल्या नोकरीच्या संधी विषयी बोलताना,बी.एस्सी नर्सिंग करण्यासाठी सी.ई.टी फॉर नर्सिंग ही परीक्षा द्यावी लागते असे.स्पष्ट केले.व या परीक्षेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्त्यांचा आढावा घेतला.यावेळी प्रा अंकिता झगडे यांनी बारावी विज्ञान सह बारावी कला,वाणिज्य च्या विद्यार्थ्याना ए.एन.एम.विषयी माहिती दिली.व कोर्स संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा.अभिजित सुर्वे,प्रा ऋषिकेश लोध,उपस्थित होते. प्रा गौरव पोंक्षे यांनी सूत्रसंचालन केले.तर