परुळे l प्रतिनिधी :योगी श्री.अरविंद गुरुकुल विद्यालय बदलापूर जिल्हा ठाणे येथील या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व त्यांचे शिक्षक वर्ग यांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभ्यास दौर्या अंतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायती ला भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतच्या कडून राबविण्यात आलेल्या विविध स्वछता विषयक उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली.
यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, सदस्य प्रदीप प्रभू, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे तसेच ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग उपस्थित होते. यावेळी मुलानी ग्रामपंचायत सांडपाणी प्रक्रिया युनिट तालुका प्लॅस्टिक संकलन युनिट तसेच काथ्या प्रकल्पाला भेट दिली अंगणवाडी व्यायाम शाळा वॉटर एटीएम आदी ची माहिती घेतली त्याचवेळी मुलानी सिंधुदुर्ग विमानतळ येथे भेट दिली व माहिती घेतली.












