मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंती देवी मंदिर येथे सात प्रहारांचा हरिनाम सप्ताह 2 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी विधिवत पूजा झाल्यानंतर हरिनाम सप्ताह प्रारंभ होईल. परिसरातील भजन मेळे आपली सेवा यावेळी देवालयात देणार आहेत. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पळसंब ग्रामस्थ भजन मंडळ पळसंब तसेच श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे.












