खा. नारायण राणे यांचे देवरूखमधील जनता दरबारात प्रतिपादन
देवरूखमधील जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जनता दरबारात तब्बल ११० निवेदने प्राप्त
निलेश जाधव / देवरूख
मी अडचणी सोडवण्यासाठी आहे, अडचणी निर्माण करण्यासाठी नाही. सर्वसामान्य जनतेची विधायक आणि विकासात्मक कामे करण्यासाठी व या भागाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी आपल्याला काम करावयाचे आहे. त्यासाठी प्रशासनाने कायमच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीचे तत्काळ निवारण केले पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी बुधवारी देवरूख येथील जनता दरबारात केले. पुढच्यावेळी नागरिकांनी निवेदने न आणता थेट बोलावे. त्यांच्या समस्यांचे िनराकरण केले जाईल, अशी ग्वाही खा. राणे यांनी यावेळी िदली.

देवरूख येथील नृसिंह मंगल कार्यालयात खा.नारायण राणे यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना खा.राणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचेही चांगलेच कान टोचले. सर्वसामान्य जनतेच्या अडचणी जाणून घेऊन पक्षाच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता निवडणूक आल्या आहेत, त्यामुळे तिकीट मागण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे. मात्र पक्षाकडे तिकीट मागत असताना आपण जनतेसाठी काय काम केले, पक्षाची ध्येयधोरणे किती राबवली, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना खा. राणे म्हणाले की, सर्वसामान्य जनतेचे काही प्रश्न आपल्या पातळीवर सुटले नाहीत तर अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना भेटावे, त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी समजून सांगावे. तुम्ही जनतेचे प्रश्न आणि त्यांच्या आलेल्या तक्रारी बरेच दिवस ठेवू शकत नाहीत. ते लवकरात लवकर निकाली काढलेच पाहिजेत. जनतेचे प्रश्न सोडवणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव आपल्याला असली पाहिजे अन्यथा मग मला माझी पद्धत अवलंबावी लागेल, असेही खा. राणे म्हणाले.
कोण जर का हेतुपुरस्सर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी चालढकल करत असेल तर त्याला सेवेत राहण्याचा अधिकार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. आपल्या संविधानाप्रमाणे कायदे बनले आहेत. त्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावेत. अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली पाहिजेत. असे सांगतानाच त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून माहिती अधिकाराचा गैरवापरही होता कामा नये, असेही सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी हे गेल्या ११ वर्षात विकसित देशाच्या दिशेने देश नेत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत त्यांनी देशाला चौथ्या क्रमांकावर आणले आहे. देशाचे दरडोई उत्पन्न वाढणे म्हणजे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणे. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. जनतेला कशाप्रकारे सुविधा दिल्या पाहिजेत याबाबतचे कायदे व नियम कार्यकर्त्यांनी वाचले पाहिजेत. मी प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखतो. म्हणून इतके वर्ष राजकारणात आहे. निवडणुका येतील व जातील परंतु पक्षासाठी जे काम करतील त्यांनाच पदे मिळतील. पक्ष ध्येयधोरणांवर चालतो. पक्षासाठी कोण काम करतो व कोण करत नाही. हे विचारले जाईल. त्यामुळे आत्तापासूनच कामाला लागा. जनतेच्या अडचणी दूर करा. पक्षामार्फत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवा, रत्नागिरी जिल्हा समृद्ध करण्यासाठी काम करा, असे कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले.
भाजप आणि मित्रपक्षांबद्दल बोलताना खा. राणे म्हणाले की, आमचे आणि मित्रपक्षांमध्ये अजिबात वैर नाही. आपआपसात राजकारण नको. एकमेकांशी प्रेमाने वागा, असा सल्लाही त्यांनी दिला. आपला भाजपा पक्ष देशासह जगात एक नंबरचा आहे आणि तो राहील. लोकप्रतिनिधी असो किंवा कार्यकर्ता असो त्यांचा जनतेशी सतत संपर्क असला पाहिजे. विकासाची कामे केली तर काहीच अडचण नाही. मात्र ती होत नाहीत म्हणून जनता दरबाराचे आयोजन करावे लागते. आपण यापुढे दर महिन्याला प्रत्येक तालुक्याला भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. या जनता दरबाराला आमदार किरण सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपचे नेते प्रशांत यादव, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, विनोद म्हस्के, महिला नेत्या रश्मी कदम, अमित केतकर, अभिजीत शेट्ये, सुशांत मुळ्ये, संतोष केदारी, शिवसेनेचे राजेंद्र महाडिक, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, तालुकाध्यक्ष प्रमोद पवार, प्रांताधिकारी विश्वजित गाताडे, उपविभागीय पोलीस अिधकारी सुरेश कदम, तहसीलदार अमृता साबळे, देवरूखचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, विविध विभागांचे अधिकारी आदिंसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जनता दरबारात राजापूर, लांजा, साखरपा िवधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी आवर्जुन हजेरी लावली. याप्रसंगी त्यांनी खा. राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी िवश्वजीत गाताडे, तहसीलदार अमृता साबळे यांनी स्वागत केले. तर तालुक्यातील ग्रामसेवक संघटना, महसूल संघटनांसह राष्ट्रवादी काँग्रेस पदािधकारी, िशवसेना पदाधिकारी यांनी खा. राणे यांचे स्वागत केले. प्रशासनाच्यावतीने मंडल अिधकारी उद्धव माने, सहयोगिता बावणे, महसूल सहाय्यक अधीक्षक श्री. आठल्ये, महसूल सेवक स्वप्निल दांडेकर आदि उपस्थित होते.
खासदार नारायण राणे यांचे देवरूख नगरीत आगमन होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच कार्यक्रमस्थळीही संगमेश्वर तालुका भाजपतर्फे तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी संगमेश्वर तालुका शिवसेना, संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी, तालुका ग्रामसेवक संघटना, मानवाधिकार संघटना, तालुका महसूल संघटना व वैभव खेडेकर यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन खा.नारायण राणे यांचे स्वागत करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांची जनता दरबारात हजेरी
देवरूख येथील जनता दरबारात वयोवृद्ध दामोदर वारे (विघ्रवली) आिण अंजली कांबळे (तुरळ) या वयोवृद्धांनी हजेरी लावत आपले प्रश्न मांडले. यावेळी खासदार राणे यांनी त्यांची आपुलकीने चौकशी करत त्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे िनर्देश संबंधित िवभागाच्या अिधकाऱ्यांना िदले.
जनता दरबारात तब्बल ११० िनवेदन प्राप्त, प्रत्येक िनवेदनावर खा. राणे यांनी केली चर्चा
देवरुख येथील जनता दरबारात रस्ते, पाणी, पूल यासह िवविध िवकासकामांबद्दल तसेच काहींच्या वैयक्तिक कामाबाबत तब्बल ११० िनवेदन प्राप्त झाली होती. प्रशासनाच्यावतीने या सर्व िनवेदनकर्त्यांना टोकन देण्यात आली होती. खा. राणे यांनी प्रत्येक िनवेदनावर िनवेदन देणाऱ्याला बोलण्याची संधी देत त्यांच्या प्रश्नाचे िनराकरण केले व संबंधित िवभागाशी िनगडित असलेल्या अिधकाऱ्यांकडे ही िनवेदने देत त्यावर कार्यवाही करून आपणाला अहवाल सादर करण्याचे िनर्देश खा. राणे यांनी दिले.









