आत्मा समितीच्या सल्लागार संचालकपदी चंद्रकांत गोलतकर यांची नियुक्ती

मसुरे | झुंजार पेडणेकर :            महाराष्ट्र शासन कृषि विभाग कार्यालय – तालुका कृषी अधिकारी,मालवण आमदार निलेश राणे यांच्या शिफारस पत्राने पळसंब गावचे माजी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांची

मालवण तालुका कृषी विभाग शेतकरी आत्मा समितीवर सल्लागार संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख श्री.दत्ताजी सामंत, उपजिल्हाप्रमुख श्री. राजा गावडे, श्री. महेश राणे, तालुका प्रमुख विनायक बाईत यांचा विश्वास सार्थकी लावणार असा विश्वास चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केला आहे.